📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

उज्ज्वल यश! ल. ना. होशिंग विद्यालयातील ; एनसीसी विभागाचा ‘अ’ प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृष्ट निकाल

उज्ज्वल यश! ल. ना. होशिंग विद्यालयातील ; एनसीसी विभागाचा ‘अ’ प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृष्ट निकाल

१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी!

जामखेड – दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी विभागाने सन २०२४-२५ मधील ‘अ’ प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगरमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत इयत्ता ९ वी (सेकंड इयर एनसीसी) विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये शिस्तबद्ध प्रशिक्षण, कठोर मेहनत आणि मार्गदर्शक शिक्षक व एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे व अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि संपूर्ण शाळेचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान, संचालिका नलिनी कुलकर्णी, संचलिका संगिता देशमुख, प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य सादिक शेख ,उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने आदींच्या वतीने करण्यात येत आहे.

प्राचार्यांची प्रतिक्रिया:

” एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात.विद्यार्थ्यांनी प्रामाणिक मेहनत, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि चिकाटीच्या जोरावर हा उज्ज्वल निकाल मिळवला आहे.भविष्यातही आमच्या विद्यालयाचा एनसीसी विभाग असाच यशस्वी ठरेल, असा मला विश्वास आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यालयातील शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात.

*प्राचार्य – बाळासाहेब पारखे , ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड*

Back to top button