📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ग्रंथपाल डॉ. सुभाष लांडगे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती

ग्रंथपाल डॉ. सुभाष लांडगे यांची उपप्राचार्यपदी नियुक्ती
परळी वैजनाथ : नवगण शिक्षण संस्था संचलित नवगण महाविद्यालय, परळी वैजनाथ येथील ग्रंथपाल डॉ. सुभाष लांडगे यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीनिमित्त महाविद्यालयात अभिनंदनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. यावेळी डॉ. सुभाष लांडगे यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व महाविद्यालयीन कार्यातील योगदानाचा गौरव करून त्यांना उपप्राचार्यपदाच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुदर्शन अवस्थी यांनी केले. यावेळी कार्यलय अधीक्षक नरेश साखरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. दिलीप गिर्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा अजिंक्य साखरे यांनी मानले.
डॉ. सुभाष लांडगे यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Back to top button