बीड
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाबाबत मा. उपमुख्यमंत्री यांना निवेदन-अविनाश तांदळे

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाबाबत मा. उपमुख्यमंत्री यांना निवेदन-अविनाश तांदळे
बीड – याबाबत सविस्तर असे की, शासकीय विश्रामगृह बीड येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत *अविनाश तांदळे* राज्य उपाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मा. *श्रीमती सुनेत्राताई पवार* उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड तसेच मा.ना.*श्री धनंजय मुंडे* यांना *श्री वैद्यनाथ विद्यालय ( माध्यमिक ) परळी वैजनाथ* या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन मागील नऊ महिन्यापासून प्रलंबित असून सर्व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असून आर्थिक बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी तीन दिवसात पगाराचा प्रश्न सोडवू याबाबत लेखी आश्वासन दिले होते परंतु एक महिना होऊनही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच मागील सहा वर्षापासून संबंधित शाळेला संस्थेचा मुख्याध्यापक नसून सेवा जेष्ठतेच्या निकषानुसार मुख्याध्यापक नियुक्त करणेबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे मागणी केली असता अद्यापही याबाबत कसलीही दखल घेतली गेलेली नाही.
याबाबत मा. *श्रीमती सुनेत्राताई पवार* व मा.ना.*श्री धनंजय मुंडे* यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना संबंधीत शाळेतील कर्मचारी यांना आपल्या स्तरावरून नियमानुसार वेतन देण्यात यावे याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते असे *अविनाश तांदळे* राज्य उपाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी एका प्रसिद्धी द्वारे कळविले आहे.



