बीड
शिवशारदा मल्टीस्टेटच्या कर्जदार सभासदांना अपघाती विमा संरक्षण

शिवशारदा मल्टीस्टेटच्या कर्जदार सभासदांना अपघाती विमा संरक्षण
—————————— ———-
जयसिंग पंडित यांच्या हस्ते रोहिणी कांबळे यांना १.८० लाख रुपयांचे वाटप
—————————— ———–
गेवराई (प्रतिनिधी) : शिवशारदा मल्टीस्टेटच्या सर्व कर्जदार सभासदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांच्या या दूरदृष्टी निर्णयामुळे सिरसादेवी शाखेच्या कर्जदाराचा विमा दावा मंजूर होऊन त्यांच्या पत्नी रोहिणी कांबळे यांना १.८० लाख रुपये रकमेचे वाटप मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
शिव शारदा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिवशारदा मल्टिस्टेटच्या सर्व कर्जदार सभासदांना अपघाती विमा संरक्षण दिले जात आहे. शिवशारदा मल्टिस्टेटच्या सिरसदेवी शाखेचे कर्जदार कै. भागवत सखाराम कांबळे यांचे दि. १३/०४/२०२६ रोजी सायं. ०५ च्या सुमारास अपघाती निधन झाले. घरातील कमवत्या व्यक्तीचे अचानक अपघाती निधन झाल्यामुळे हा परिवार खचून गेला होता.
शिवशरदा मल्टीस्टेट कडून कर्जदार सभासदांना देण्यात आलेल्या विमा संरक्षणमुळे त्यांचा युनायटेड इन्शुरन्स या विमा कंपनीने २.५० लाख रुपयांचा विमा दावा मंजूर केला. मयत कांबळे यांचेकडील उर्वरित कर्ज भरणा करून घेऊन त्यांच्या पत्नी श्रीमती रोहिणी भागवत कांबळे यांना शिवशारदा मल्टिस्टेटच्या वतीने १.८० लाख रुपये देण्यात आले. श्रीमती रोहिणी कांबळे यांनी सदर रक्कम मल्टीस्टेटच्या सिरसदेवी शाखेत मुदत ठेव म्हणून गुंतवणूक केली आहे. मुदत ठेव पावती शिव शारदा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांच्या हस्ते रोहिणी कांबळे यांना सुपुर्द केली. खातेदार आणि कर्जदार यांचा शिवशारदा मल्टीस्टेटवर असलेला विश्वास या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. अपघाती निधन पावलेल्या कांबळे परिवारातील वारसांनी जयसिंग पंडित यांचे याप्रसंगी आभार व्यक्त केले.
यावेळी सिरसदेवी ग्राम पंचायतचे सरपंच रवींद्र गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराई शहराध्यक्ष दीपक आतकरे, संचालक आवेज शरीफ व शिवशारदा मल्टीस्टेटच्या सिरसदेवी शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.



