बीड

पिंपरखेडचे हॅट्ट्रिक सरपंच बापूराव ढवळे यांचा तालुकाध्यक्षपदी सत्काराने गौरव

पिंपरखेडचे हॅट्ट्रिक सरपंच बापूराव ढवळे यांचा तालुकाध्यक्षपदी सत्काराने गौरव

भाजपा रत्नापूर व ग्रामस्थांकडून नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्षाचा सन्मान

जामखेड (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झालेले पिंपरखेडचे हॅट्ट्रिक सरपंच बापूराव ढवळे यांचा फेटा बांधून व पेढा भरवून भारतीय जनता पार्टी रत्नापूर व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवि सुरवसे, उद्योजक गोरख घनवट, राहुल चोरगे, भटक्या विमुक्त आघाडीचे तालुका अध्यक्ष पिंटू (वस्ताद) माने, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष शरद मोरे, ओबीसी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गिरी, युवा नेते सोमनाथ दरे, विलास मोरे, प्रगतशील शेतकरी भरत वराडे, बाळासाहेब मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बापूराव ढवळे हे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी असून सौम्य, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते तालुक्यात परिचित आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपाला गावपातळीवर बळकटी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Back to top button