बीड

तरुणांनी मल्लखांब खेळातून गावचे नाव उज्वल करावे – योग शिक्षक बाळासाहेब पारखे

तरुणांनी मल्लखांब खेळातून गावचे नाव उज्वल करावे – योग शिक्षक बाळासाहेब पारखे

श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेत ९ वा जागतिक मल्लखांब दिन उत्साहात साजरा

जामखेड : प्राचीन भारतीय परंपरेतून पुढे आलेला मल्लखांब हा खेळ जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी ९ वा जागतिक मल्लखांब दिन जामखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने जामखेड शहरातील श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्था, जामखेड यांच्या वतीने मल्लखांब खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगशिक्षक तथा ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे उपस्थित होते.

सर्वप्रथम, महाबली हनुमान व मल्लखांबचे आद्यगुरू बाळंभट्ट देवधर व मल्लखांबाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे बाळासाहेब पारखे व संस्थेचे राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू कु.स्नेहल भोसले, चि.कृष्णा जगदाळे, चि.शत्रुघ्न जरे तसेच राज्यस्तरीय खेळाडू चि.रितेश खुपसे यांचा सत्कार करण्यात आला..

त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसमोर संस्थेच्या खेळाडूंनी मल्लखांब व रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.

यावेळी बोलताना योगशिक्षक तथा ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे म्हणाले की, मल्लखांब हा शारीरिक व मानसिक ताकद वाढवणारा पारंपरिक भारतीय खेळ आहे. नवीन पिढीने या खेळात रुची घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या गावाचे नाव उज्वल करावे तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष टेकाळे हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या व संस्थेच्या माध्यमातून तालुका , जिल्हा, राज्य व देशपातळीवर विद्यार्थांचे नाव झळकत आहेत.अशा कामगिरी चा मला अभिमान वाटतो.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री संतोष (बबलु) टेकाळे, सचिव अमोल निमोणकर,उपाध्यक्ष राजेंद्र भांबे, आकाश टेकाळे,रविराज क्षिरसागर, रोनित खुपसे, बबलु राऊत,गणेश माने,कल्याण माने,तसेच जामखेड परिसरातील क्रीडाप्रेमी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button