डिजिटल शिक्षणाची कमाल! बी.के. शिंदे ज्युनिअर कॉलेजचा बारावी निकाल जिल्ह्यात अव्वल

डिजिटल शिक्षणाची कमाल! बी.के. शिंदे ज्युनिअर कॉलेजचा बारावी निकाल जिल्ह्यात अव्वल
१०० टक्के निकालाची परंपरा कायम
जामखेड : येथील श्रीनाथ एज्युकेशन फाउंडेशन संचलित बी.के. शिंदे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
२ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयाने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली.बारावी (एच.एस.सी) बोर्ड परीक्षा सन २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या निकालामुळे विद्यालयाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल क्लासरूम आणि काटेकोर नियोजन या यशाच्या त्रिसूत्री’वर चालणाऱ्या या महाविद्यालयाने कमी कालावधीतच मोठी झेप घेतली आहे. केवळ बोर्ड परीक्षाच नव्हे तर जी, नीट आणि एम.एच.टी.- सी.ई.टी.सारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांनी तालुक्यात बाजी मारत आपली छाप उमटवली आहे.
सायन्स शाखेतील टॉपरांची चमक :
प्रथम – सबुरी भंडारी : ८८.३३ टक्के
द्वितीय – अभिजित निकम : ८७.८३ टक्के
तृतीय – सोनाली काकडे : ८७.५० टक्के
याशिवाय तब्बल ३८ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत मेरिट लिस्ट मध्ये स्थान मिळवले आहे. सायन्ससोबतच कला शाखेचाही निकाल १०० टक्के लागल्याने संस्थेची सर्वांगीण गुणवत्ता सिद्ध झाले आहे.
बी. के. शिंदे शैक्षणिक संकुल जामखेड हे केवळ निकालापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी विविध अभ्यासक्रमांची जोड देत आहे. डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (रक्त व लघवी तपासणी), टायपरायटिंग मराठी-इंग्रजी (३०/४०), स्वप्नपूर्ती अभ्यासिका तसेच जी,नीट, एम.एच. टी.- सी.ई.टी. परिक्षेच्या मार्गदर्शन वर्गांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम बनवले जात आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ.मंगल बाळासाहेब शिंदे व सचिव बाळासाहेब काशिनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त करत,यशाची ही घोडदौड अशीच कायम ठेवणार, असा विश्वास व्यक्त केला. तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले आहे.



