मुंबई

लाडाने माझी पत्नी मला दाऊद हाक मारायची, समीर वानखेडे यांच्या वडिलांचा दावा

 

समीर वानखेडे यांनी आपली धार्मिक ओळख लपवून प्रशासकीय सेवेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला बुधवारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याची कागदपत्रे जाहीर केली होती.

मात्र दुसरीकडे समीर वानखेडे यांच्यां वडिलांनी केलेल्या अजब दाव्यावर आता संशय व्यक्त केला जात आहे. एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना अशी हाक मारली जाते. तसंच माझ्या पत्नीचे नातेवाईक किंवा अन्य कोणीतरी मला प्रेमाने दाऊद हाक मारत असावेत. मी ही शक्यता नाकारत नाही, असा अजब दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.

कोणीही मला काहीही हाक मारत असो, पण मी मागासवर्गीय आहे. मग माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होऊ शकतो? फेसबुकवर दाऊद वानखेडे या नावाने प्रोफाईल असल्याचे मला माहिती नाही. पण एखादवेळी माझ्या पत्नीकडील नातेवाईक मला दाऊद म्हणाले असतील, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले. तसेच आपण लवकरच समीर वानखेडे यांच्या खरा जन्मदाखला सादर करु, असा दावाही ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.

Back to top button