राजकीय

उल्हासनगरात राजकीय भूकंप भाजपच्या २२ नगरसेवकांचा राष्ट्र्वादीत प्रवेश

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसताना दिसून येत आहे. यापूर्वी जळगाव महानगर पालिकेत शिवसेना पक्षाने भाजपाला धक्का दिल्यानंतर आता उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. भारतीय जनता पक्षातून निवडून आलेले तब्बल २२ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह काही महत्वाच्या नेत्यांनी पप्पू कलानी यांची भेट घेतली या भेटीनंतर ही माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यकम संपल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची भेट कलानी महल येथे घेतली. या भेटीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आणखी मोठी झाली असून भाजपला मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, टीम ओमी कलानीतील २२ नगरसेवक हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र दुसरीकडे भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. हे २२ नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नसल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात हे नागरसेवकर भाजपात राहणार की स्वगृही पार्टनर हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल

Back to top button