बीड

नियमित योगाभ्यास हाच आरोग्याचा मंत्र — संजय काशिद जागतिक योग दिनानिमित्त जामखेडमध्ये भाजपा शहर मंडलाचे योग शिबिर संपन्न

नियमित योगाभ्यास हाच आरोग्याचा मंत्र — संजय काशिद

जागतिक योग दिनानिमित्त जामखेडमध्ये भाजपा शहर मंडलाचे योग शिबिर संपन्न

जामखेड प्रतिनिधी —जागतिक योग दिनानिमित्त जामखेड शहरात भाजपा शहर मंडल च्या वतीने शहरातील श्री नागेश्वर मंदिर परिसरात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपा शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद म्हणाले की,नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचा अंगीकार अत्यंत आवश्यक आहे.

या शिबिराचे संयोजन पोपट राळेभात यांनी केले असून, योग प्रशिक्षक उमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास घेण्यात आला.

यावेळी प्रविण चोरडिया,मनोज कुलकर्णी, संजय राऊत सर, ॲड.प्रविण सानप,सोमनाथ राळेभात,पवन राळेभात, डॉ. विठ्ठल राळेभात,प्रवीण होळकर, ऋषिकेश मोरे, विजय कुलकर्णी, संतोष निमोणकर,अंदुरे, मदन कुलथे, अशोक कुलथे पाटील, दत्ता झगडे, परमेश्वर राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
योग प्रशिक्षक उमेश देशमुख यांनी सहभागी सभासदांना स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित पुस्तके भेट दिली. ल.ना. होशिंग येथे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी शिबिरात सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नगरसेवक मोहन पवार, प्रवीण बोलभट, दिगंबर चव्हाण, मोहन मामा गडदे अण्णासाहेब ढवळे, उमेश माळवदकर यांनी तपनेश्वर येथील जिल्हा परिषद शाळा, लोकमान्य शाळा व ल.ना. होशिंग विद्यालय येथे तसेच चुंबळी येथे भाजपा वाॅरियर्स शक्ती प्रमुख मोहन (मामा) गडदे यांनी विद्यार्थ्यांसह योग प्रात्यक्षिके सादर केली.

Back to top button