📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ हरपला : राजर्षी शाहू कन्या विद्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ हरपला : राजर्षी शाहू कन्या विद्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

बीड (प्रतिनिधी)राजर्षी शाहू कन्या विद्यालयात दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री. एस. सी. जगताप यांनी आपल्या मनोगतातून अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय व लोकहितकारी कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी “क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ गेला असून क्रीडाक्षेत्र पोरके झाले आहे”अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादा पवार यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष इंजि. बलभीमराव जाहेर पाटील, संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. डी.कदम, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. टी. राऊत तसेच राजमाता इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या श्रीमती आर. डी. लोखंडे उपस्थित होते. या श्रद्धांजली कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button