बीड

खर्डा येथे छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या नियोजन बैठकीत एकमत; पत्रकारांचा होणार गौरव

खर्डा येथे छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या नियोजन बैठकीत एकमत; पत्रकारांचा होणार गौरव

जामखेड प्रतिनिधी (खर्डा) — येत्या २९ जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने खर्डा येथे नियोजन बैठक पार पडली.

या बैठकीत खर्डा किल्ल्यापासून बस स्टँडपर्यंत भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बस स्टँडसमोर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या कार्यावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन होणार आहे.

विशेष म्हणजे, खर्डा परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्र चे संचालक बापूसाहेब ओव्हळ यांनी बैठकीत दिली आहे.

या नियोजन बैठकीस ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापूसाहेब ओव्होळ, तसेच विशाल पवार, तुकाराम पवार, राहुल पवार, राजू शिंदे, भिमराव सुरवसे, उर्मिला कवडे, मंगल शिंगाणे, निशा कांबळे, लहू पवार, वसंत पवार, फकीर मदारी, नाना काळे, राहुल काळे, दत्ता काळे, सुनीता काळे, रुकसाना मापाडी, लखन जाधव यांसह परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या जयंतीच्या यशस्वी आयोजनासाठी विविध जाती-धर्मांतील कार्यकर्त्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे नियोजन नेटके व शिस्तबद्ध ठेवण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Back to top button