बीड
मोहा परिसरातील बेकायदेशीर कला केंद्रांवर कारवाईची मागणी

मोहा परिसरातील बेकायदेशीर कला केंद्रांवर कारवाईची मागणी
तहसीलदारांना निवेदन सादर
जामखेड प्रतिनिधी
मोहा हद्दीतील काही कला केंद्रांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन दत्तात्रय आजबे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संबंधित कला केंद्रे शेतीच्या जागेवर परवानगीशिवाय सुरू असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय, मद्यविक्री व सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचत असल्याचा उल्लेख करण्यात आला असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



