📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

‘एनएमएमएस’ परीक्षेत आयुष बोधले अव्वल; १४९ गुण प्राप्त

‘एनएमएमएस’ परीक्षेत आयुष बोधले अव्वल; १४९ गुण प्राप्त

गुणवंत आयुषवर कौतुकाचा वर्षाव

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत श्री नागेश विद्यालय, जामखेड येथील विद्यार्थी आयुष अविनाश बोधले याने ‘एन.एम.एम.एस.’ (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आयुषने या परीक्षेत तब्बल १४९ गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ही स्पर्धात्मक परीक्षा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध तयारी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर आयुषने हे यश मिळवले आहे.

या यशामागे मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. बुद्धिमत्ता विभागाचे प्रमुख देशमुख एस.एस., विज्ञान विषयाचे मडके बी.के. व पठाण ए.एन., सामाजिक शास्त्र विषयाचे लटपटे डी.व्ही. तसेच गणित विषयाचे चौधरे ए.बी. यांनी आयुषसह सर्व विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती,सल्लागार समितीच्या सर्व सदस्य, पत्रकार बांधवांनी आयुषचे विशेष अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आयुष अविनाश बोधले याच्या या दैदिप्यमान यशामुळे जामखेड तालुक्यात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.

Back to top button