बीड

राज्यस्तरीय (SQAAF) मूल्यांकनात केंद्र शाळा तेलंगशी अ प्लस श्रेणी प्राप्त ..

राज्यस्तरीय (SQAAF) मूल्यांकनात केंद्र शाळा तेलंगशी अ प्लस श्रेणी प्राप्त ..

जामखेड प्रतिनिधी: राज्यातील सर्व शाळांचे SQAAAF मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षा द्वारे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन (SQAAF) गुणवत्ता तपासणी कक्षाची ची निर्मिती करण्यात आली.

यामध्ये 102675 शाळांचे मूल्यांकन करण्यात आले.तसेच तत्पूर्वी शाळां द्वारे स्वयं मूल्यांकन ही करण्यात आले होते. त्यामधील 10644 शाळांचे बाह्य पुनर्मल्यांकन करण्यात आले. यानंतर त्यामधील शाळांचे बाह्यमूल्यांकनात 429 शाळांना अ प्लस गुणवत्ता श्रेणी प्राप्त झाली आहे.
सदर बाह्य मूल्यांकनात अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पाच शाळांना अ प्लस श्रेणी प्राप्त झाली असून यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तेलंगशी शाळेने ‘अ’ प्लस श्रेणी प्राप्त केली आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक तीन मध्ये सुद्धा तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व मूल्यांकनामध्ये शाळेची इमारत, मैदान, विद्यार्थी गुणवत्ता, शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा, वाचनालय, ई लर्निंग, विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, शिक्षक गुणवत्ता, शालेय पोषण आहार, शाळेतील विविध उपक्रम, नवोपक्रम, संस्कृती व सामाजिक उपक्रम, विविध स्पर्धात्मक परीक्षा या सर्व उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलंगशी अव्वल ठरल्यामुळे ‘अ’ प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. या कामी माननीय गटशिक्षणाधिकारी माननीय प्रदीप चव्हाण, विस्तारअधिकारी जालिंदर खताळ,अशोक आंधळे व श्रीमती पार्वती गाडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच केंद्रप्रमुख केशव गायकवाड,विक्रम बडे व राम निकम, भौतिक सुविधेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्रीमती. चंद्रकला सुभाष(आप्पा) जायभाय यांनी योगदान दिले.

शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रेवणनाथ ढाळे,तेलंगशी गावच्या सरपंच श्रीमती कविताताई ढाळे, मुख्याध्यापक संतोष गोरे, मल्हारी पारखे, रविंद्र धस,अशोक जाधव, संतोष खेडकर,बाळासाहेब खेडकर, विशेष शिक्षक शशिकांत वैद्य, सुशेन चेंटमपल्ले,विजयकुमार रेणुके, श्रीमती लक्ष्मी जायभाय,विकास पाचरणे या सर्वांच्या परिश्रमातून शाळेला ‘अ’ प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.

यामुळे तेलंगशी शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मिशन आपुलकी या उपक्रमांतर्गत शाळेला 26 जानेवारी 20000 रुपये ग्रामस्थांकडून देणगी प्राप्त झाली आहे.

Back to top button