बीड
धाकटी पंढरी (धनेगाव) येथील महापूजेला आकाश बाफना उपस्थित ; विठुरायाला साकडे

धाकटी पंढरी (धनेगाव) येथील महापूजेला आकाश बाफना उपस्थित ; विठुरायाला साकडे
जामखेड प्रतिनिधी –जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील धाकटी पंढरी येथे पार पडलेल्या महापूजेसाठी जामखेड येथील आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी उपस्थित राहून विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यात पाऊस पडावा, बळीराजा सुखात रहावा अशी भावनिक प्रार्थना विठ्ठल चरणी केली. तसेच जामखेडचे भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या
पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या
जामखेड ते धाकटी पंढरी (धनेगाव) या भव्य पायी दिंडी सोहळ्यात बाफना यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या भक्तिमय दिंडी सोहळ्याप्रसंगी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष महावीर बाफना, नगरसेवक मोहन पवार, पिंटूशेठ बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.



