बीड

युनिक फाउंडेशन तर्फे बक्षीस वितरण व शालेय साहित्याचे वाटप

युनिक फाउंडेशन तर्फे बक्षीस वितरण व शालेय साहित्याचे वाटप
बीड (प्रतिनिधी);- रविवार दिनांक 23-2-2025  जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा रोशन पुरा बालेपीर येथे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा रोशन पुरा येथे शहरातील प्रसिद्ध आरोग्य व शिक्षण क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणार्‍या युनिक फाउंडेशन च्या वतीने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये भाग घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वही, पाटी, वॉटर बॅग व इतर शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले. यावेळी युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष पठाण आबेद यांच्या प्रस्ताविक भाषणानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी अब्दुल हमीद साहब होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुलाम साकिब हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सादेख भाई शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख सलमान नसीर, मुफ्ती इलियास, आसिफ पठाण, हाफेज मोहसीन, काजी साहब, शेख जहीर भाई आणि अलाउद्दीन भाई उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाळण्यासाठी युनिक फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा रोशनपुरा बालेपीरच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Back to top button