बीड

अरं प्रशासना प्रशासना झोपलास का; दोन वर्षांपासून आंदोलने!

अरं प्रशासना प्रशासना झोपलास का; दोन वर्षांपासून आंदोलने!
सामाजिक कार्यकर्त्यांचा २१ जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सर्व्हे नं. 622 मध्ये 02 एकर 20 गुंठे जागे बाबत जो अकृषि परवाना व लेआऊट नगर रचनाकार बीड यांनी मंजुर केला त्या प्रमाणे सर्व्हे नं. 622 मध्ये बगीचा व ओपन स्पेस जागेवरती अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण हटविण्याबाबत दिनांक 24/05/2024 रोजी दिलेल्या अर्जावर आजपर्यंत (दि. 20/01/2026) कसल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे दिनांक 21/01/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपाषणास बसणार असल्याचा इशारा असीम सादेक जरगर आणि जमील युसूफ कुरेशी यांनी निवेदनातून दिला आहे.
याविषयी विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे धारुर ता. धारुर जि.बीड येथील सर्व्हे नं. 622 मध्ये श्री. सुरेश रामचंद्र तेलंग (कोमटवार) यांनी व्हे नं. 622 हे अकृषि परवानगी घेऊन त्यामध्ये खुले प्लॉट पाडून विक्री केले आहेत. सदर अकृषि परवानगीस दि. 14/10/1993 रोजी मा. नगर रचानाकार, बीड यांनी सर्व्हे नं. 622 मध्ये लेआऊट प्लॅन नियमाप्रमाणे मंजुर केला सदर लेआऊट प्लॅन मध्ये धारुर ते आडस शिवाजी महाराज पुतळ्या पासून जाणाऱ्या रोड लगत पुर्वेकडून ओपन स्पेस व पश्चिमेकडून बगीचा व रस्त्या करीता जागा सोडलेली असतांना देखील उपरोक्त सर्व्हे नं. 622 चा अकृषि परवानगी मंजुर करते वेळी घालून दिलेल्या नियम व अटीचे कोटकोर पणे पालन करणे गरजेचे होते.
 तसेच मा.नगर रचनाकार, बीड यांनी लेआऊट प्लॅन मंजुर करते वेळी नियोजीत बगीचा, ओपन स्पेस जागा सोडणे बाबत नियम व अटी घातलेल्या असतांना देखील सदर सर्व्हे नं. 622 मध्ये ओपन स्पेस व बगीचा कुठेही केलेला नाही. या उलट त्यासाठी सोडलेली जागा ही सर्व्हे नं. 622 च्या मालकांपरस्पर बेकायदेशीर रित्या बेभाव विक्री करुन त्यावरती दुकान, गाळे हे आज रोजी उभे केलेले आहेत. व सदर बगीचा व रस्त्यासाठी खुली जागा धारुर शहरातील धनदांड्या, भुमाफिया लोकांनी अतिक्रमणीत केल्यामुळे आम्ही दिनांक 24/05/2024 रोजी आपल्या कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात अतिक्रमण काढणे बाबत अर्ज दिला होता. परंतू आपल्या कार्यालयाकडून अर्जावर कसल्याही प्रकारे उत्तर आम्हाला प्राप्त झालेले असून व संबंधित जागेचे अतिक्रमण काढण्यास जाणीपुर्वक टाळाटाळ करत असल्याचे दिसून आलेले आहे. तसेच नगर परिषद, धारुर यांनी दिनांक 22/01/2025 रोजीच्या पत्रान्वये पण आजपर्यंत कसल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही झालेली नाही किंवा सदरील जागेचे अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.
म्हणून जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाचा तात्काळ विचार करुन सर्व्हे नं. 622 मध्ये 02 एकर 20 गुंठे जागे बाबत जो अकृषि परवाना व लेआऊट नगर रचनाकार बीड यांनी मंजुर केला त्या प्रमाणे सर्व्हे नं. 622 मध्ये बगीचा व ओपन स्पेस जागेवरती अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण हटविण्याबाबत दिनांक 24/05/2024 रोजी दिलेल्या अर्जावर आजपर्यंत (दि. 20/01/2026) कसल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास दि.21/01/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपाषणास बसण्यात येईल. असा इशाराही धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते असीम सादेक जरगर आणि जमील युसूफ़ कुरेशी यांनी निवेदनातून दिला आहे.
Back to top button