बीड

वारकऱ्यांच्या सेवेत संजय (काका)काशिद मित्रमंडळ : पालखी सोहळ्यात अल्पोपहार वाटप

वारकऱ्यांच्या सेवेत संजय (काका)काशिद मित्रमंडळ : पालखी सोहळ्यात अल्पोपहार वाटप

जामखेड प्रतिनिधी –मराठवाड्यातील सर्वात मोठा आणि एकमेव दिंडी असलेला श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी जामखेड शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले तसेच स्वागत करण्यात आले. भाजप शहरमंडल अध्यक्ष संजय (काका) काशिद मित्र मंडळाच्या वतीने शहरातील लक्ष्मी चौक येथे वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे उपस्थित होते. यावेळी
ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर,कृषी उत्पन्न बाजारचे सभापती शरद कार्ले, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष रवि सुरवसे, ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी,दिगांबर चव्हाण,मोहन पवार,डॉ. संजय भोरे, अमित जाधव,पवन राळेभात,अँड. प्रविण सानप, मोहन (मामा) गडदे,डॉ. विठ्ठल राळेभात, सरपंच महारुद्र महारनवर, तात्याराम पोकळे, महालिंग कोरे,आण्णासाहेब ढवळे, विक्रांत घायतडक,उद्धव हुलगंडे, दिगंबर चव्हाण, सुरज काळे, किरण ओझर्डे, राहुल चोरगे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१२५ वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या एकमेव दिंडीचा मान असून, लाखो भाविक टाळ-मृदंगाच्या गजरात विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत.

Back to top button