बीड

सारोळा प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर निर्मिती,चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन…!

सारोळा प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पोस्टर निर्मिती,चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन…!

जामखेड (प्रतिनिधी): शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या ठिकाणी,ज्ञान विज्ञानाची धरूया कास,करूया राष्ट्राचा विकास ” या थीमप्रमाणे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन तसेच रामन इफेक्ट,वैज्ञानिक दृष्टिकोन, छोटे प्रयोग,हे असेच का?, विज्ञान व अंधश्रद्धा,विज्ञान शाप की वरदान,विज्ञानाचे विविध क्षेत्रातील योगदान या विविध विषयावर शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केले.आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सारोळा गावचे भूमिपुत्र तसेच आदित्य कृषी महाविद्यालय बीड या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे धनंजय भीमराव सातपुते सर उपस्थित होते.सातपुते सरांनी कृषी विश्वातील विज्ञानाचे महत्व या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले.
आजच्या दिना निमित्त सारोळा प्रशालेतील विद्यार्थी करिता पोस्टर निर्मिती, चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.सदर स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थी यांचा बक्षीस प्रदान करून सन्मान करण्यात आला.यावेळी परीक्षक म्हणून धनंजय सातपुते सर यांनी काम पाहिले.
आजच्या कार्यक्रम निमित्त उपस्थित राहून परिक्षक म्हणून काम पाहिले तसेच अनमोल असे मार्गदर्शन केल्याबद्दल धनंजय सातपुते सर यांचा सारोळा प्रशालेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी प्रशालेतील सारोळा प्रशालेचे मुख्याध्यापक माजीद शेख,पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,राहुल लिमकर, उपाध्यापक प्रशांत होळकर सर, उपाध्यापिका शबाना शेख ,वृषाली खांदवे व अमृता रसाळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते…!

Back to top button