बीड

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यशाळा

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ज्ञानेश्वर विद्यालयात कार्यशाळा

पुणे प्रतिनिधी :-श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील प्रहारी गट आणि आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने 26 जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके साहेब यांनी मार्गदर्शन केले. या दिनाचे वैशिष्ट्य सांगताना अमली पदार्थाचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणारे गंभीर परिणाम उदाहरणासह विद्यार्थ्यांना पटवून दिले.

व्यसनाधीनतेमुळे तरुणांचे उध्वस्त होणारे जीवन, अवैध तस्करी, त्या संदर्भाचे कायदे यासंदर्भात विश्लेषण करताना शालेय जीवनामध्ये जनजागृती किती अत्यावश्यक आहे हे आपल्या मनोगतातून त्यांनी अधोरेखित केले.
समाजातील व्यसनाधीनता रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून सक्षमपणे जनजागृती केली पाहिजे. या जबाबदारीची आठवण करून देताना मूल्य शिक्षण देणाऱ्या विद्यालयातील संस्कारक्षम” ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या उपक्रमाचे कौतुकही केले.
याप्रसंगी आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी मच्छिंद्र शेंडे, दामिनी पथकातील दिव्यांका घाडगे, पूजा नाईक, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नारायण पिंगळे, प्रकाश पवार, जगदीश गायकवाड आणि राजू सोनवणे यांनी केले.

Back to top button