संपादकीय

पुण्यातील एसटी कामगार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम

 

पुणे | मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला नाही. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्यसरकरमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याची ठाम भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. पुण्यातील एसटी कर्मचारी आंदोलक आपल्या संपावर ठाम आहेत. शहरातील स्वारगेट व शिवाजीनगर आगारात आंदोलनाला बसलेला एकही एसटी कर्मचारी कामावर परतलेला नाही.

जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी मान्य होता नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं कामगारांनी म्हटलं आहे. आमच्यातील एकही कर्मचारी कामावर हजर झाला नसून संप फोडण्यासाठी अफवा पसरवल्या जात असल्याचं मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. स्वारगेट बसस्थानकातून शिवशाही बसेस जागेवरच उभ्या आहेत. तर खासगी बसेसमधून प्रवाश्यांची वाहतूक सुरु आहे.

माझी एसटी कामगारांना कळकळीची विनंती आहे. आता परिवहन मंत्री अनिल परबांनी केली पगार वाढ तात्पुरती आहे. त्री समितीचा अहवाल ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे जर शासनात विलीनीकरण असेल तर महामंडळाचे विलीनीकरण केले जाईल. विलीनीकरण नसेल तर पुढचा विचार करू असे म्हटले आहे. तोपर्यंत एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा १२ आठवाड्याचा अहवाल येई पर्यंतचा काळ सहन करावा. आपल्या कुठल्या कर्मचाऱ्याचं नुकसान होवू नये. कारण सरकार सरकार असते, कर्मचारी कर्मचारी असतो असे आवाहन स्वारगेट डेपोचे चालक संजय मुंडे यांनी कामगारांना केलं आहे.

Back to top button