संपादकीय

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल

 

नगर जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी आग लागून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जणांवर उपचार सुरु आहेत. नगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितलं.

आयुक्त पांडे म्हणाले, निष्काळजीपणामुळे मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरोधात भादंवि कलम 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ( म्हणाले, राज्य सरकारकडून या अग्निकांडप्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असून सरकारनं वारंवार रुग्णालयांना फायर ऑडिट करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे.

Back to top button