बीड

गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; २० मे रोजी उजव्या कालव्यातून पाणी सोडणार

गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; २० मे रोजी उजव्या कालव्यातून पाणी सोडणार
गेवराई, दि. १८ : गेवराई तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून पैठण येथून सुटणाऱ्या उजव्या कालव्यात दिनांक २० मे रोजी शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे व पाण्याच्या वापराचे नियोजन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याने सिंचनासाठी आवश्यक तयारी, शेतीमधील पाण्याचे मार्ग, मोटारी व इतर साधनांची तपासणी करून ठेवावी, जेणेकरून पाण्याचा योग्य लाभ घेता येईल.
दरम्यान, पाणी सोडण्याच्या वेळापत्रकात अथवा नियोजनात काही बदल झाल्यास संबंधित विभागाकडून तात्काळ माहिती देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Back to top button