📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खेळ पैठणीचा व विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खेळ पैठणीचा व विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भोसले यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- (प्रतिनिधी) :- कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणी व विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भोसले व मित्र परिवार यांनी दिली आहे.
कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे हे स्वभावाने स्वच्छ,निर्मळ, अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे दिलखुलास व्यक्तीमत्व,शेती, शिक्षणा बरोबरच सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन चालनारे व प्रत्येकाला आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहेत. शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असतो त्याचबरोबर प्रत्येकास प्रेमाणे वागणुक देत गोरगरिबांना व सर्वसामान्यांना वेळप्रसंगी सहकार्य मदत करणारे आधार देणारे नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बाणाई नगरचा राजा साई सृष्टी कॉलनी गणेश मंडळ यांच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम व विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वाढदिवसनिमित्त मित्र परिवाराच्या वतिने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी गायक सुभाष शेप व फटाक्याची अतिषबाजीचे कार्यक्रमचे आयोजित करण्यात आला आहे. तरी परिसरातील महिलांना, गृहिणींना प्रोत्साहीत करण्यासाठी आयोजलेल्या या अभिनव स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन  सर्व सामाज उपयोगी कार्यक्रमास मित्र मंडळींनी व तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भोसले व बाणाइ नगरचा राजा साई सृष्टी कॉलनी गणेश मंडळ, मित्र परिवार, अंबाजोगाई ( 89758 98471) यांनी दिली आहे.

Back to top button