महाराष्ट्र

सरकार स्थिर आहे म्हणूनच आम्ही फिरतोय, जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार लवकरच कोसळेल अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून अर्हताःत विरोधकानाकडून होताना दिसून येत होती. या टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्याकडून सडेतोड प्रतिउत्तर मिळताना दिसून येत होते. त्यातच आता विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

पाटील म्हणाले की, आमचं सरकार स्थिर आहे म्हणूच आम्ही फिरतोय. सरकार अस्थिर असते तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकवण्याचे प्रयत्न केले असते. तशी वेळ आमच्यावर अजून आलेली नाही. आमचे सरकार स्थिर असून तिन्ही पक्ष एक दिलाने काम करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला.

पुढे बोलताना पाटील म्हणले की, दोन वर्षापासून सरकार कोसळणार असल्याचं ऐकत आहोत. पण आमचं सरकार स्थिर आहे. सरकार अस्थिर असते तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकवण्याचे प्रयत्न केले असते. तशी वेळ आमच्यावर अजून आलेली नाही. आमचे सरकार स्थिर असून तिन्ही पक्ष एकसंघपणे काम करत आहेत, असं पाटील यांनी माध्यमांना सांगितलं होत.

Back to top button