बीड

तिसरीचा राजवीर नवनाथ खोत इस्रो (ISRO) सहल विमान प्रवासाने अनुभवणार

तिसरीचा राजवीर नवनाथ खोत इस्रो (ISRO) सहल विमान प्रवासाने अनुभवणार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी शाळेच्या विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षेतून निवड; राजवीरवर अभिनंदनाचा वर्षाव

जामखेड । तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा गितेवाडी या शाळेचा तिसरीचा गुणवंत विद्यार्थी राजवीर नवनाथ खोत याला स्पर्धा परीक्षेतून भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) अभ्यास दौरा विमान प्रवासासाठी निवड झाली आहे.

भारतीय टॅलेंट सर्च (BTS) या स्पर्धा परीक्षेत राजवीरने 150 पैकी 148 गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तो शांत, संयमी व अभ्यासू विद्यार्थी असून. अनेक स्पर्धा परीक्षेत राजवीर ने उत्तम

कामगीरी केली आहे. हिंद सेवा मंडळ परीक्षेत 300 पैकी 274 गुण आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत 200 पैकी 170 गुण लक्षवेध परीक्षेत 300 पैकी 282 गुण मिळविले आहेत तसेच राजवीर इ दुसरी मध्ये असताना मंथन व अक्षरगंगा या दोन्ही स्पर्धा परीक्षेत त्याने 150 पैकी 150 गुण घेऊन राजवीरने महाराष्ट्रतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे

स्पर्धा परीक्षेतील त्याची तयारी उत्तम असून सातत्य, जिद्द , चिकाटी याच्या साथीला वर्गशिक्षक तथा स्पर्धा परीक्षेतील

गुणवंत शिक्षक श्री. चंद्रकांत अरण्ये सर यांचे अचूक मार्गदर्शन याच्या जोरावर राजवीरने हे उत्तुंग यश मिळविले आहे. भारत टॅलेंट सर्च परीक्षेतून महाराष्ट्रातून १ली ते ८वी च्या प्रत्येक इयत्तेतील प्रथम तीन क्रमांक मिळवणार्या गुणवंतांना इस्रो येथे विमान प्रवासाची अनोखी संधी मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तिसरी इयत्तेतून राजवीर हा एकमेव विद्यार्थी विमानातील सफर अनुभवणार आहे. लहान वयात राजवीरने मिळवलेल्या
या उत्तुंग यशाबद्दल राजवीर चें सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल माननीय गटशिक्षणाधिकारी धनंजय बोदार्डे साहेब ,विस्तार अधिकारी अशोक आंधळे साहेब , जालिंदर खताळ साहेब , केंद्रप्रमुख केशव गायकवाड साहेब ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश होडशिळ , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कुंडलिक गिते व सर्व ग्रामस्थ यांनी भरभरून कौतुक केले आहे.

Back to top button