📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांना सर्जिकल गाऊनचे वाटप

विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांना सर्जिकल गाऊनचे वाटप
शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचा स्तुत्य उपक्रम
शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीच्या वतीने शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांना सर्जिकल गाऊनचे वाटप
बीड (प्रतिनिधी) लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांचे दि.१४ ऑगस्ट रोजी पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीने सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. यावेळी बीड येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांना सर्जिकल गाऊनचे वाटप करण्यात आले आहे. या प्रसंगी
शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे कार्याध्यक्ष मनीष सुहास पाटील, अमोल नवले, अनिकेत साळवे, उत्कर्ष कुलकर्णी, विक्की गिरी आदी उपस्थित होते.
 लोकनेते विनायक मेटे यांची पुण्यतिथी विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा व्हावी. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या सूचनेनुसार पुण्यतिथी निमित्त मेटे साहेबांना अभिप्रेत सामाजिक उपक्रम राबत त्यांच्या स्मृतिदिनी सामाजिक उपक्रम राबवत त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीने घेतला याचाच भाग म्हणून शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांना सर्जिकल गाऊनचे वाटप करण्यात आले आहे.
Back to top button