कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात रोहित क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण
नवगण राजुरी दि.16(प्रतिनिधी)ः- सौ.के.एस.के. (काकू) अन्नतंत्र व कृषिमहाविद्यालय, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात युवा नेते रोहित क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
80 व्या स्वतंत्र दिनानिमित्त प्रारंभी महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अनंत कृषि विकास प्रतिष्ठानचे सहसचिव डॉ.गोविंद साळुंके, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र कुटे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जिल्हास्तरीय रेड इन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या सौ.के.एस.के. (काकू) कृषि महाविद्यालयाची ज्ञानेश्वरी शिंदे, सर्वस्वी शिंदे, कोमल मोरे, पायल पवार, चैतन्या बागडे, अभिजीत निकम, श्रीकृष्ण ताटे या विद्यार्थ्यांचा रोहित क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.