बीड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी शितलताई महेश दाभाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी शितलताई महेश दाभाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
गेवराई (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाच्या वतीने मा.आ. अमरसिंह पंडित व आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मा. नगराध्यक्ष महेश अण्णा दाभाडे यांच्या पत्नी सौ. शितलताई महेश दाभाडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
            गेवराई नगरपरिषद ची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून प्रचाराला वेग आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजप व राष्ट्रवादीमध्ये काट्याची टक्कर होणार असून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणार असल्याचे बोलले जात आहे. विजयसिंह पंडित आमदार झाल्यानंतर त्यांनी गेवराई शहराकडे बारकाईने लक्ष देऊन 11 महिन्यात अतिशय वेगाने गेवराई शहरात विकासाची भरपूर कामे केली. या झालेल्या कामामुळे गेवराई शहराच्या वैभवात भर पडली आहे. तसेच नगरपरिषद ची निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सर्वसाधारण घरातील सौ.शितल महेश दाभाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दि. 11 गुरुवार रोजी अतिशय साध्या पद्धतीने दाखल केला त्यामुळे सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून त्यांची गेवराई शहरात प्रतिमा निर्माण झाली आहे. तसेच ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून प्रस्थापितांना सर्वसाधारण घरातील उमेदवार टक्कर देणार आहे.
Back to top button