बीड

अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला बळ! नंदकिशोर मुंदडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गुलाब बोराडे यांचा ‘हात’ सोडत ‘कमळ’ हाती!

अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला बळ! नंदकिशोर मुंदडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गुलाब बोराडे यांचा ‘हात’ सोडत ‘कमळ’ हाती!

अंबाजोगाई प्रतिनिधी :-आगामी अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. नमिताताई मुंदडा, युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या विकासात्मक व प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत, प्रभाग क्रमांक ०५, भिम नगर येथील मोठे सामाजिक कार्यकर्ते गुलाब बोराडे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.

​या प्रवेशामुळे अंबाजोगाई येथील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या हस्ते पक्षात प्रवेश
​गुलाब बोराडे यांनी आपल्या समर्थकांसह, आदरणीय नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या शुभ हस्ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी मुंदडा परिवाराच्या विकास कामांच्या दृष्टिकोन आणि समाजाला सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेचा गौरव करण्यात आला.
​प्रवेश केलेल्या गुलाब बोराडे यांनी यावेळी बोलताना, “मुंदडा कुटुंबाच्या नेतृत्वाखाली केज आणि अंबाजोगाई तालुक्यात झालेले लक्षणीय विकास कार्य पाहून आम्ही प्रभावी झालो आहोत. या विकासात्मक वाटचालीस हातभार लावण्यासाठी आणि भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही पक्षात सहभागी झालो आहोत,” असे स्पष्ट केले.
​या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशावेळी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button