बीड

कुणाच्या दबावाखाली नाही तर गावाच्या विकासासाठी माझा राष्ट्रवादीत प्रवेश—–उपसरपंच तुकाराम तळतकर

कुणाच्या दबावाखाली नाही तर गावाच्या विकासासाठी माझा राष्ट्रवादीत प्रवेश—–उपसरपंच तुकाराम तळतकर

==============
तुकाराम तळतकर यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला —अमरसिंह पंडित
==============
उपसरपंच तुकाराम तळतकर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल
==============
गेवराई दि.२३(प्रतिनिधी) सत्ता असो नसो शिवछत्र परिवार कायम शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत आला आहे,आता तर सत्ता आपली आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजना आपल्या पर्यंत घेऊन येण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. उपसरपंच तुकाराम तळतकर यांनी बंगाली पिंपळा गावात केलेल्या कामामुळे जनतेचा विश्वास त्यांच्यावर वाढला आहे. त्यांना बळ देऊन शासकीय योजनांना गती देण्याचे काम केले जाईल असे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी तर आमचे नेते अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देणार असल्याचे सांगून कुणाच्या दबावाखाली नाही तर बंगाली पिंपळा गावच्या विकासासाठी आपण शिवछत्र परिवारात सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे उपसरपंच तुकाराम तळतकर यांनी सांगितले.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे बंगाली पिंपळा गावचे उपसरपंच तुकाराम तळतकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि त्यांच्य असंख्य सहकार्यांनी गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन्नाथ काळे, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष कालिदास नवले, डॉ.विजयकुमार घाडगे, विश्वनाथ सोनवणे, बळीराम रसाळ, पवन चव्हाण, विकास सानप, संदीपान दातखीळ, राजेंद्र कदम, सचिन ढाकणे, गणपत राठोड, परमेश्वर खरात, ईस्माईल भाई, बळीराम रसाळ, विश्वनाथ सोनवणे, युवराज जाधव, दिपक बोर्डे, पवन चव्हाण, प्रशांत लांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बंगाली पिंपळा येथील उपसरपंच तुकाराम तळतकर यांच्यासह सरपंच बाळासाहेब गायकवाड, चेअरमन बाबासाहेब भुईभार, व्हाईस चेअरमन रावसाहेब दातार, राजाराम गरवडे, बळीराम चौधरी, शिवाजी भिलगुडे, अजगरअली जहागिरदार, नारायण गोलार, दिलसुक चौधरी, संतराम शिंदे, नाथजी सोलनकर, पंढरीनाथ जाधव, मिठू राठोड, विठ्ठल गोटाधर, विठ्ठल गायकवाड, लियाकत अली उस्मान
यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करुन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत निष्ठेने काम करण्याचा निर्धार केला‌.
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, बंगाली पिंपळा येथील उपसरपंच तुकाराम तळतकर यांच्यासह सामान्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला याचा मला आनंद आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बंगाली पिंपळा येथे शासकीय योजनांना गती देण्याचे काम केले जाईल.एक वर्षात या भागातील बंधाऱ्याचे काम स्वतः जातीने लक्ष ठेवून पुर्ण केले जाईल. शेतीसह पिण्याचे पाणी, स्मशानभूमी आणि रस्त्यांचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.
बंगाली पिंपळा येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांनी अमरसिंह पंडित यांचे वाजत गाजत स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button