
गेवराई येथे मतिमंद निवासी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा
दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यासह गुलाब पुष्प देवून केले स्वागत
गेवराई : राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये १६ जून पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून त्यानिमित्ताने शहरातील मतिमंद निवासी विद्यालयात प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यासह गुलाब पुष्प देवून प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग व शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महांडूळा संचलित मतिमंद निवासी विद्यालय गेवराई , ता.गेवराई जि.बीड येथे सोमवार दि.१६ जुन २०२५ रोजी प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्यासह गुलाब पुष्प देवून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, त्वरितादेवी व डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव शिवाजी ढोबळे, विशेष शिक्षक रविंद्र अरबाड , डॉ.प्रल्हाद बोंदरे ,वस्तीगृह अधिक्षक संदिप खाडे , कार्यालयीन लिपीक विनोद पौळ , श्रीमती भागिरथी उगले, आकाश गिरी , प्रशांत सरोदे , संतोष पुंड , अक्षय दातार , अंकुश लाटे , रमेश गोळेकर , राजेंद्र ढाकणे , विष्णू बर्वे सह पालक वर्ग, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..



