
शिवम चिकाने खून प्रकरणी 302 चा गुन्हा दाखल…..
शोकाकुल वातावरणात शिवम चिकने यांच्या पार्थिवावर गंगावाडी येथे अंत्यसंकर….
=========================
शिवम चे पार्थिव पोलिस गेट समोर ; आरोपींना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस ठाण्या समोर आक्रोश…
========================
आरोपींना अटक करून कार्यवाही करण्यात येईल – सपोनी मनोज निलंगेकर
गेवराई प्रतिनिधी :-मारहाण करणाऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना जो पर्यंत अटक होत नाही आणि या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहने जप्त करण्यात येत नाहीत ते पर्यंत शिवम वर अंत्यसंस्कार करणार नाहीत असा पवित्रा गंगावडी येथील शिवम च्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी घेत प्रेत पोलिस स्टेशन समोर ठेवून आपला राग व्यक्त केला. या मारहाण प्रकरणी युवक मयत झाल्या नंतर काशिनाथ चिकाने यांच्या फिर्यादी वरुण आरोपी गणेश उर्फ लल्लू सुखदेव यादव,शिवम गणेश यादव,तुकाराम छगन मांगले,राजाभाऊ उत्तम यादव,ईश्वर गोवर्धन यादव,सर्व राहणार गंगावाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे.
प्रेम प्रकरणाचा संशय घेऊन मारहाण झालेल्या शिवम चिकाने या युवकाचा उपचारादरम्यान जे जे रुग्णालय छत्रपती संभाजी नगर याठिकाणी मृत्यू झाल्या नंतर शवविच्छेदन करून युवकाचे पार्थिव अंत्यसंस्कार साठी गंगावाडी गावाकडे आणले होते या आधीच संतप्त कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी मारहाण करणारे आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करत मयत शिवम चे पार्थिव पोलिस स्टेशन समोर ठेवले होते. जो पर्यंत पोलिस प्रशासन आरोपींना अटक करणार नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता.यावेळी सपोनी मनोज निलंगेकर यांनी शिवम चिकाने यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना तीन आरोपी अटक केले असून उर्वरित लवकरात लवकर अटक करण्यात येतील असे सांगितले तसेच आरोपींना मदत करणाऱ्यांना ही सोडणार नाही असे सांगितले.मारहाणी नंतर मयताचे वडील काशिनाथ चिकाने यांच्या फिर्यादी वरुण भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम 109,126(२),189(२),191(२),191(२),190 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता .आता यामध्ये नव्याने 302 आताचे नवीन कलम 102 अन्वये गुन्हा नोंद झाला असल्याचे सपोनी निलंगेकर यांनी सांगितले.
चौकट….
1)आरोपींना पकडण्यात पोलिस प्रशासना कडून चालढकल पना होत आहे असे आढळून आल्यास आम्हाला उपोषणअथवा रास्तारोको यासारख्या पर्यायाचा अवलंब करावा लागेल तशी वेळ पोलिस प्रशासनाने येऊन देऊ नये असे यावेळी गावकऱ्यांनी पोलिस अधिकारी आणि प्रशासनाला सांगितले.त्याच बरोबर यामध्ये कोण कोण छुप्या मार्गाने सहभागी आहेत याचा तपास लावण्यात यावा आणि त्यांना सहआरोपी करावे अशी मागणी करण्यात आली.
2)तीन आरोपी ताब्यात…
खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तलवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन पैकी मुलीच्या वडिलांना कोर्टाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.उर्वरित आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.



