संपादकीय

टीम इंडिया चा स्टार खेळाडू डेंजर झोन मध्ये! कधीही भारताच्या संघातून जाऊ शकतो बाहेर

 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळवला जाणार आहे.  टीम इंडियाच्या या स्टारचे करिअर धोक्यात? वरिष्ठ वेगवान गोलंदाज इशांत शर्माने २००७ साली बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढच्याच महिन्यात इशांतला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

इशांतने आतापर्यंत ८० एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो ११५ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला असला तरी शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये तितका या यशस्वी ठरला नाही. आगामी मालिकांसाठी तरुणांबाबत लवकरच मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, त्यासाठी टीम इंडियामध्ये तयारी सुरू झाली आहे.

इशांतची एकदिवसीय कारकीर्द चांगली आहे असे म्हणता येईल, परंतु निवडकर्त्यांनी त्याला 2016 पासून एकही वनडे खेळण्याची संधी दिलेली नाही. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे. सिराजसारखे गोलंदाज कसोटीच्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत टीम इंडियातून इशांत शर्माचे पत्ता कट होऊ शकतो. इशांतने १०० हून अधिक कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने ३११ विकेट्स घेतल्या आहेत.

Back to top button