बीड

पंचायत समितीच्या भोंगळ कारभारावर कारवाई करा : तुषार बोथरा

पंचायत समितीच्या भोंगळ कारभारावर कारवाई करा : तुषार बोथरा

जामखेड प्रतिनिधी -१४जामखेड पंचायत समितीत मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरु असून पंचायत समितीला सक्षम अधिकारी देऊन होत असलेल्या गैरव्यहाराची तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे युवा नेते तुषार बोथरा यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांना निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड पंचायत समिती येथे भोंगळ कारभार चालू असून सर्व सामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत असून पंचायत समिती येथील कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही. येथे येणाऱ्या सामान्य लोकांकडे अधिकाऱ्यांकडून चहा पाण्याच्या नावाखाली लाच मागितली जाते वरील सर्व बाबीची तातडीने चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी तुषार बोथरा यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील मांच्याकडे केली आहे

Back to top button