अहिल्यानगरचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती

अहिल्यानगरचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती
अहिल्यानगर (जामखेड प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सरकारने २२ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या बदल्यानुसार ,आहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक माननीय श्री राकेश ओला यांची बदली बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त (डीसीपी) या पदावर करण्यात आली आहे त्यांच्या जागी रायगड चे पोलीस अधिक्षक माननीय श्री. सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदल्यामुळे आहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नवीन नेतृत्वाची स्थापना झाली आहे.माननीय श्री.सोमनाथ घार्गे हे रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे.
या बदल्यांमध्ये राज्यभरातील २१ पोलीस अधिक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक ग्रामीण,आहिल्यानगर ,रत्नागिरी, बुलढाणा, धाराशिव, पालघर, कोल्हापूर, अकोला, नागपूर रेल्वे पोलीस, आणि इतर जिल्ह्यांचा समावेश आहे.या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात नवीन नेतृत्वाची स्थापना झाली आहे, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा आहे.



