बीड
कृषी उद्योजक दादाभाऊ घुगे यांचे अल्प आजाराने निधन, अचानक निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त

कृषी उद्योजक दादाभाऊ घुगे यांचे अल्प आजाराने निधन,
अचानक निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त
कोळगांव :- दि.२२ ( प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील कवडगांव येथील रहिवाशी तथा कोळगांव येथे कृषी दुकानदार परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी दादाभाऊ घुगे यांचे अल्पश्या आजाराने दि.२० मे रोजी पहाटे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे ६५ वय होते. ही दुःखद घटना पंचक्रोशीतील गावांना हळहळ वाटणारी ठरत आहे.
गेवराई तालुक्यातील कवडगांव सारख्या छोट्याशा गावातील रहिवाशी असलेले दादाभाऊ घुगे आपल्या लहान वयातही वडीलांच्यासमवेत लहान बंधूला सोबत घेऊन व्यवसाय धंदा शिकले होते. गरिब परिस्थितीवर मात करून घरची परिस्थिती हळूहळू सुधारत कवडगांव, बंगाली पिंपळा साठेवाडी, कोळगांव, सावरगाव, खडकी मानकापूर गाडेवाडी, मादळमोही, काजळा तांदळा परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखले जाई. लहान भाऊ मुलांच्या आधारावर उद्योजक म्हणून व्यवसाय वाढत होता. नेहमीच श्रीराम कृषी सेवा केंद्र उद्योजक असणारे दादाभाऊ घुगे सर्वांसाठी आदराचे नाव होते.. पंचक्रोशीतील लहान मोठ्या शेतकऱ्यांना नागरिक युवकांना ख्यातनाम सहकारी मित्र वाटणारे एक सर्व परिचित व्यक्तीमत्व होते. अनेक संकटांवर मात करून परिसरात दादाभाऊ घुगे यांच्याकडे पाहिले जात होते. पण काळाच्या काळचक्रात शुगर बीपी अन् हृदय विकाराच्या आजाराने ग्रस्त झाल्यामुळे बीड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दि.२० मे २०२५ रोजी ०२:३० वाजता निधन झाले. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पडत्या पावसात करण्यात आले. यावेळी परिसरात नागरिकांनी दुःख व्यक्त करत हळहळ व्यक्त केली. अंत्यसस्कांर वेळी गावातील जेष्ट नागरिक, व्यापारी, कृषी दुकानदार,नातेवाईक, यासह कवडगांव परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे कार्यकर्ते, डॉक्टर, नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, मुले, मुली, सुना, पुतणे,नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. तर कोळगाव कवडगांवातील दुकानदार, व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
……… चौकट
दादाभाऊ घुगे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर….
दादाभाऊ तुकाराम घुगे हे आपल्या जन्मगावासह पिंपळा, कोळगाव यासह वीस ते पंचवीस गावात सामाजिक कार्य असो किंवा गोरगरिबांचा कार्य असो यामध्ये नेहमी त्यांचा अग्रेसर सहभाग असे. त्याचबरोबर आराध्य दैवत असणारे श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड, येथील प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा नेहमीच सहभाग असेच. पण त्याचबरोबर मोलाचे सहकार्य श्रमदान,अन्नदान आर्थिक हातभार असे यामुळे त्यांना दत्ता महाराज यांचे आवडते शिष्य अन् रामाचे भक्त म्हणून ओळखले जात होते. पंचक्रोशीतील गावागावातील प्रभू श्रीराम नवीन मंदिर बांधण्यासाठी मोठ्या योगदानासह चांगल्याप्रकारे भरिव आर्थिक मदत देणारे म्हणून ओळखले जात होते.



