बीड

अपघातग्रस्तांचे प्राण वाचल्याबद्दल डॉ. संजय तांदळे अपोअ सचिन पांडकर यांच्या हस्ते सन्मानित. 

अपघातग्रस्तांचे प्राण वाचल्याबद्दल डॉ. संजय तांदळे अपोअ सचिन पांडकर यांच्या हस्ते सन्मानित.
बीड (प्रतिनिधी) : बीड शजिल्ह्यात रस्ता सुरक्षा बाबत व्यापक जनजागृती करून आणण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान 2026 चा दि.20 फेब्रुवारी 2026 शुक्रवारी रोजी पोलीस मुख्यालय येथे समारंभ पूर्वक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात समारोप झाला. या अभियानांतर्गत आयोजित प्रबोधन शिबिराला रिक्षा चालकासह युवा वर्ग व विद्यार्थ्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काॅंवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर पोलीस अमलदार, अजिनाथ मुंडे,सखाराम घोलप आदींच्या पुढाकाराने दि.21 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 दरम्यान हे अभियान जिल्हाभर राबविण्यात आले. या अभियानात रस्ता सुरक्षा विषयी विविध शाळेमध्ये जाऊन प्रबोधन करून विविध स्पर्धांचे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार,  प्रशिक्षणार्थी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल कुमार साहेब, प्र. पोलीस उपाधीक्षक उमाशंकर कस्तुरे, राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई,  जिल्हा वाहतूक शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर आधी मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.  यावेळी अपघातग्रस्तांचे प्राण वाचवल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बीड शहरातील नगर रोडवरील चंपावती शाळा कॉम्प्लेक्स समोर दि. ३ जानेवारी २०२६ शनिवार रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता महावीर कर्नावट वय वर्षे चाळीस राहणार कोळगाव ता. गेवराई जि. बीड येथील रहिवासी असून नगर रोडवर अज्ञात वाहनाने त्यांच्या टू व्हीलरला धडक दिल्याने अपघात झाला होता. सामाजिक  कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे व सहकारी यांनी रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त मोटर सायकल स्वरास रस्त्याच्या कडेला घेण्यात आले.त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यावरील जखमेतून रक्ताची धार वाहत होती. कापूस व हातरुमालने जखम बांधून त्यांना  रिक्षात टाकून शासकीय रुग्णालयात तातडीने  दाखल करण्यात आले. दवाखान्यात त्यांच्यावर डॉक्टरांनी व नर्स टीमने उत्तम उपचार केले.व त्यांचे प्राण वाचले.  दुसऱ्या घटनेमध्ये दि. 18 जानेवारी 2026 रोजी पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाट्यावरून बीड कडे सायंकाळ दरम्यान जात असताना तांबा राजुरी जवळ  रस्त्याच्या कडेला एक 60 वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती टू व्हीलर वरून अपघात होऊन रक्त बंबाळ अवस्थेत खाली पडलेली होती. जखमीअवस्थेत त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यांवर उपचार करून त्यांचे देखील प्राण वाचवले आहेत.  डॉ संजय तांदळे यांनी आतापर्यंत अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवलेले आहेत.यात एका पोलीस उपनिरीक्षक यांचा देखील समावेश आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी रस्ता सुरक्षा अभियानामध्ये देखील त्यांचा सहभाग होता.करिता डॉ. संजय तांदळे यांचा अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
Back to top button