बीड

जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील निराधारांना हक्काचे घर मिळवून देणार – आश्वासन

जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील निराधारांना हक्काचे घर मिळवून देणार – आश्वासन
गेवराई | प्रतिनिधी
बीड शहरातील भाजी मंडई परिसरात असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला भेट देत येथील निराधार बांधवांशी संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान अनेकांच्या डोळ्यातील वेदना आणि आयुष्याशी सुरू असलेला संघर्ष पाहून उपस्थित वातावरण भावूक झाले.
निवारा केंद्रातील नागरिकांनी “आम्हालाही हक्काचे घर आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, समाजाने माणुसकीच्या नात्याने आधार द्यावा,” अशी भावनिक अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भविष्यात या बेघर आणि निराधार नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा शब्द देण्यात आला. तसेच पालिका प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून शासन मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय पालिकेच्या माध्यमातून उद्यान, बेघर निवारा केंद्रासाठी रुग्णवाहिका तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले. जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला हक्काचा निधी मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष श्री. विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी श्री. शेख मुजीब, सभापती श्री. शेख निजाम, नगरसेवक ॲड. महेश धांडे, श्री. शेख बिलाल, श्री. भिमराव वाघचौरे, श्री. मनोज गोडसे, श्री. भैय्यासाहेब मोरे, श्री. प्रमोद शिंदे, श्री. भास्कर जाधव, श्री. भागवत तावरे, श्री. शेख इकबाल, श्री. आनंद पवार यांच्यासह मुख्याधिकारी श्री. शैलेश फडसे तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Back to top button