बीड

मंथन राज्यस्तरीय परीक्षेत जामखेडचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंथन राज्यस्तरीय परीक्षेत जामखेडचा उत्स्फूर्त प्रतिसाद

६ परीक्षा केंद्रावर ३७६४ विद्यार्थ्यांचा सहभाग

जामखेड प्रतिनिधी: जामखेड तालुक्यात नुकतीच पार पडलेली मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा तिच्या शिस्तबद्ध नियोजन आणि मोठ्या सहभागामुळे शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.तालुक्यातील खाजगी जि.प.इंग्लिश स्कुल,अशा २०० पेक्षा जास्त शाळेंनी सहभाग नोंदवला होता.यामध्येइ.१ ते ८ वी मराठी सेमी व इंग्रजी माध्यमाचे एकुण ३७६४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ही परीक्षा ल.ना.होशिंग विद्यालय,जामखेड महाविद्यालय,खेमानंद इंग्लिश स्कुल ,रायसेना इंटरनॅशनल स्कुल जामखेड तसेच खर्डा इंग्लिश स्कुल खर्डा व नंदादेवी विद्यालय नान्नज या परीक्षा केंद्रावर अत्यंत नियोजनबद्ध ,शिस्तबद्ध , व यशस्वीपणे पार पडली.त्यामुळे मंथन परीक्षेने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. यामध्ये मंथन जामखेड तालुका समन्वयक अशोक जावळे,अशोक आजबे,अविनाश जावळे,एकलव्य स्कुलच्या सर्व शिक्षिका यांनी एक महिना परीक्षेचे नियोजन करुन परीश्रम घेतले. तसेच संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षिका पालक , यांनी वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन परीक्षेचा सराव घेतला.
मंथन परीक्षेच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाली असून, शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Back to top button