📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निष्ठावंत काँग्रेस कार्याची दखल; वसंतराव मुंडे यांची किसान काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती.

निष्ठावंत काँग्रेस कार्याची दखल; वसंतराव मुंडे यांची किसान काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती.

परळी वैजनाथ |(प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी गेल्या चार दशकांपासून एकनिष्ठ राहून पक्षसंघटनेसाठी सातत्याने कार्य करणारे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते वसंतराव मुंडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किसान काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाची, पक्षनिष्ठेची आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे परळी वैजनाथसह बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वसंतराव मुंडे यांनी पक्षाची विचारधारा आणि संघटनात्मक बांधिलकी जपत आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला आहे. पक्षाच्या कठीण काळातही निष्ठा कायम ठेवत सामान्य नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांशी जोडून राहण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ कार्याची वरिष्ठ नेतृत्वाने दखल घेतली आहे.
वरिष्ठ नेतृत्वाच्या विश्वासातून महत्त्वपूर्ण जबाबदारी
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्षपद श्री. नाना पटोले , माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज बाबा चव्हाण महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ ,काँग्रेसचे गटनेते आ विजय वड्डेंटीवार, किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री पराग पास्ते यांनी वसंतराव मुंडे वर वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेला विश्वास आणि सोपविलेली जबाबदारी ही आपल्या एकनिष्ठ पक्षकार्याची पावती असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली.
या नियुक्तीबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून काम करणार
महाराष्ट्रातील शेतकरी आज अनेक नैसर्गिक, आर्थिक आणि प्रशासकीय समस्यांना सामोरे जात आहेत. विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, अनियमित पाऊस, पिकांचे नुकसान, पीकविमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यातील अडचणी, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाई अशा प्रश्नांनी शेतकरी त्रस्त आहेत.
पीकविमा आणि नुकसानभरपाईचा प्रश्न, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत, जनावरांसाठी चारा छावण्या व पाणी उपलब्धता, शेतमालाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या या विषयांना प्राधान्य देऊन काम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे वसंतराव मुंडे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या समस्या केवळ निवेदनांपुरत्या मर्यादित न ठेवता त्या शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करणे, यासाठी किसान काँग्रेसच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील
 शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
मराठवाडा व विदर्भात सातत्याने दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतीविषयक संकटांचा सामना करणारा प्रदेश आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मालाचा हमीभाव, शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणे, पीकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना किसान काँग्रेसच्या माध्यमातून प्राधान्य देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मानले आभार
या नियुक्तीबद्दल बोलताना वसंतराव मुंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून साथ देणाऱ्या काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचे, मित्रपरिवाराचे, ज्येष्ठ मंडळींचे आणि हितचिंतकांचे विशेष आभार मानले. आजवर सर्वांनी दिलेले प्रेम, विश्वास, आशीर्वाद आणि सहकार्य हीच आपली खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षाने दिलेली ही जबाबदारी म्हणजे केवळ पद नसून शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची मोठी संधी आणि जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
वसंतराव मुंडे यांच्या या नियुक्तीबद्दल काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Back to top button