
अजित पवारांनी गुंडांची टोळी पोसली- विजयकुमार घाडगे
शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास नेत्यांना गावात फिरू देणार नाही
बीडमध्ये पत्रकार परिषद : शेतकऱ्यांचा पोरावरील हल्ल्याचा बदला शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून घेणार- विजय कुमार घाडगे
प्रतिनिधी | बीड:-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे सोडून राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रम्मी खेळत असल्याने आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही सुनिल तटकरे यांना लातूर मध्ये पत्ते भेट दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गुंडानी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. अजित पवार यांनी कृषी मंत्री यांच्याबद्दल निर्णय घेतला मात्र हल्ला करणाऱ्या गुंडांचा सन्मान करून त्यांना पक्षात मोठ स्थान दिलं. शेतकऱ्यांच्या पोराने शासनाला प्रश्न विचारले तर राष्ट्रवादीचे हे गुंड त्यांच्यावर हल्ला करत आहेत. हे अजित पवार गटाला परवडणारे नाही. आम्ही याचा बदला शेतकऱ्यांच्या कापसाला १० हजार रूपये, सोयाबीनला ८ हजार रूपये हमी भाव घेऊन आणि पिक विमा शेतकऱ्यांच्या पदरात पाडून अशा भ्याड हल्याचा बदला घेणार असल्याचे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी केले.
ते बीडमध्ये शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बीड जिल्हाध्यक्षा अशोक रोमन यांच्यासह छावाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना विजयकुमार घाडगे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केल्यानंतर चार दिवसाच्या उपचारांनंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तेव्हा अजित पवार म्हणाले ज्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही. माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. कृषी मंत्री यांच्या बदद्ल अजित पवार यांनी निर्णय घेतला मात्र, आमच्या जखमा ओल्या असताना आमच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांना पक्षाच्या फादर बॉडीत घेऊन अजित पवार यांनी नविन पायंडा पाडला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असा समज झाला आहे. की शेतकऱ्यांच्या विरुध्द राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. शेतकऱ्यांच्या पोराला मारहाण करण्यासाठी अजित पवार यांनी गुंडांची टोळी ठेवली आहे. जशास तसे उत्तर छावा संघटना देत आहे. मात्र आम्ही या सरकारकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्याचा बदला पूर्ण करणार आहोत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करूण घेणार आहोत. जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर नेत्यांना गाव बंदी करणार आहोत. असे विजयकुमार घाडगे म्हणाले.
——
अशोक रोमन यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी
अशोक रोमन यांनी बीड जिल्ह्यातील गोरगरीबांच्या प्रश्नांवर आवाज उठवून ते शासन दरबारी सोडवण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला आहे. या सोबतच युवकांची मोठी फळी त्यांच्या मागे आहे. लवकरच त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिली.
या पत्रकार परिषेदेला अखिल भारतीय छावाचे बीड जिल्हाप्रमुख अशोक अण्णा रोमन, संभाजीनगर जिल्हाप्रमुख अशोक मोरे पाटील, लातूर जिल्हा प्रमुख दीपक नरवडे, जालना जिल्हाप्रमुख संदीप ताडगे यांच्यासह विद्यार्थी आघाडी प्रमुख पप्पू लांडे पाटील, शहर प्रमुख सचिन हरणमारे, पप्पू शिंदे, पप्पू मस्के पाटील, दत्ता काशीद, दत्ता साळुंके, शंकर,श कुरळे, बाळू कदम, विठ्ठल अण्णा काळे, सिद्दिकी फारुकी, वाजेद खान, अविनाश हातागळे, अमोल अंकुटे, सतीश मस्के, गिरीश करवा आदी उपस्थित होते.



