बीड

महाडीबीटी अनुदान अडकलं कुठे?; अनिलदादा जगताप यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

महाडीबीटी अनुदान अडकलं कुठे?; अनिलदादा जगताप यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल
*महाडीबीटी अनुदान वितरणाला गती द्या; बीड जिल्हाधिकाऱ्यांना अनिलदादा जगताप यांचे निवेदन!*
बीड, प्रतिनिधी- बीड मतदारसंघातील महाडीबीटी अंतर्गत लॉटरी पद्धतीने पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ वितरीत करण्यात यावे, अशी ठोस मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लॉटरी प्रक्रियेत निवड झाल्यानंतर अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खरेदी पूर्ण केली आहे. मात्र सहा-सहा महिने उलटूनही अनुदानाची रक्कम खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाच्या योजनेत पात्र ठरूनही निधी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून तात्काळ निर्णयाची अपेक्षा आहे. पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान तत्काळ मंजूर करून त्यांच्या खात्यात जमा करावे, जेणेकरून शेतकरी बांधवांवर अन्याय होणार नाही. असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
Back to top button