मुंबई

क्रांती रेडकरने समीर वानखेडेंसाठी शेअर केली खास पोस्ट

 

मुंबई | आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे फार चर्चेत आले आहेत. सध्या एनसीबीने वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्या तपासावरून काढून टाकलं आहे. तर दुसरीकडे दिवाळीच्या निमित्ताने समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने एक फोटो शेअर केलाय. याला क्रांतीने एक भावनिक पोस्टही लिहीली आहे. क्रांती रेडकरने दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर पती समीर वानखेडे यांना औक्षण करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘तू देशासाठी खूप जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती’ असं म्हटलंय. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून सतत हल्लाबोल सुरु असताना क्रांती रेडकर वानखेडेंची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पत्रकार परिषद घेऊन अनेक मलिक यांच्यावर बेछुड आरोप करत पती समीर वानखेडे यांचे कौतुक केले आहे.

क्रांती तिच्या पोस्टमध्ये म्हणतेय, ‘माझा प्रिय… माझ्या उर्जेचा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत, तुझ्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे. तुझ्याकडे असणारी शांतता मला खूप काही शिकवून जाते. तुझा दृढनिश्चय तसंच तुझा प्रामाणिकपणा मला नेहमीच आश्चर्यात टाकतो. देशाप्रती तुझा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती आहे.’ तुझ्या आपल्या लोकांसाठी किती सुंदर योजना आहेत हे फक्त मला माहीती आहे. मला तुझा दररोज अभिमान वाटत राहो.” अशी भावनिक पोस्ट क्रांतीने शेअर केली आहे.

Back to top button