बीड
कोळगाव येथील बाबासाहेब गवळी एक जून्या पिढीतील जाणते कृषी माहिती असलेले जेष्ठ नागरिक काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त ..

कोळगाव येथील बाबासाहेब गवळी एक जून्या पिढीतील जाणते कृषी माहिती असलेले जेष्ठ नागरिक काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त ..
कोळगाव येथील रहिवासी बाबासाहेब गवळी यांचे उपचारादरम्यान निधन
कोळगाव प्रतिनिधी- गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी तथा जून्या पिढीतील जाणते संयमी शांत कृषी माहिती असलेले जेष्ठ नागरिक बाबासाहेब गवळी यांचे दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली झाले. मृत्यू समयी (वय- ६५) होते.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील जेष्ठ रहिवासी असलेले बाबासाहेब उर्फ देवजी गणपत गवळी यांचे मागील काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर बीड, संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होता. दरम्यान मागील दहा दिवसांपासून संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. पण दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली झाले. मृत्यू समयी (वय- ६५) होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक,गावातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली भाऊ असा मोठा परिवार आहे. बाबासाहेब गवळी हे मराठा आरक्षणच्या चळवळीतील कार्यकर्ते अविनाश गवळी, नानासाहेब गवळी यांचे वडील होते. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ संयमी, कार्यकुशल होते. जून्या पिढीतील एक जाणते माहिती असलेले जेष्ठ नागरिक काळाच्या पडद्याआड गेले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या निधनाने सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे.



