बीड

गोरगरीब,कष्टकरी तसेच सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणजे ज्ञानबोधिनी विद्यालय -डॉ. संतोष मुंडे

गोरगरीब,कष्टकरी तसेच सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणजे ज्ञानबोधिनी विद्यालय -डॉ. संतोष मुंडे

ज्ञानबोधनी प्रा. विद्यालयाचे न भूतो न भविष्यती असे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

ज्ञानबोधिनी विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात रंगला भव्य दिंडी सोहळा

परळी प्रतिनिधी;-ज्ञानबोधिनी प्रा.विद्यालय ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था नाही तर ती ज्ञानाबरोबरच गोरगरीब कष्टकरी तसेच सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच उच्च दर्जाचे गुणवत्ता पूर्ण व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविणारी परळी शहरातील एक अग्रगण्य शाळा आहे असे गौरवोद्गार आपल्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. संतोष मुंडे साहेब (उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई )यांनी काढले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री पी. एस. घाडगे सर (माजी अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री .अमोल शिंगणे साहेब (पी.एस.आय. परळी शहर पोलिस स्टेशन) यांच्यासह डॉ. अशोक मगर साहेब (श्रीराम हॉस्पिटल )श्री. प्रदीप मुंडे (युवा सरपंच तळेगाव )श्रीमती प्रेमीला ताई तांदळे मॅडम (माजी मुख्याध्यापक संस्कार शाळा )डॉ. सौ सुवर्णा टिंबे मॅडम (सिद्धिविनायक हॉस्पिटल) श्री. बालासाहेब फड (अध्यक्ष परळी तालुका पत्रकार संघ ), गोविंद महाराज केंद्रे तालुका अध्यक्ष अंबाजोगाई  इंजि. मुकुंद शेप डॉ.श्वेता मुकुंद शेप सौ.वर्षाताई मुंडे (अध्यक्ष ज्ञानबोधिनी विद्यालय) श्री. प्रशांत मुंडे (उपाध्यक्ष ज्ञानबोधिनी विद्यालय) डॉ. श्रीनिवास मुंडे ,श्री .लक्ष्मण मुंडे सर (सचिव तथा मुख्याध्यापक ज्ञानवर्धिनी विद्यालय )आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पी. एस. घाडगे सर यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की ज्ञानबोधिनी विद्यालय ही ज्ञानदानयाबरोबरच आदर्श,शिस्त लावणारी आणि उच्च शिक्षण देणारी शाळा आहे. या शाळेची वाटचाल अगदी योग्य दिशेने व या शाळेत  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव श्री. लक्ष्मण मुंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविक पर  भाषणात ज्ञानबोधिनी विद्यालय राबविले जाणारे उपक्रम,पालक मेळावे,वर्गनिहाय विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करण्यात येणारे प्रयन्त ,आगामी काळात राबविले जाणारे उपक्रम याविषयी माहिती सांगितली. ज्ञानबोधनी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले .या सोहळ्यासाठी  शहरातील पंचवटी नगर मधील श्रद्धा मंगल कार्यालय या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या अविस्मरणीय सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या कलागुण दाखवले. विद्यार्थ्यांची प्रत्येक कला ही सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी होती. रंगमंचावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य ज्यात गणेश वंदना, हुंडवणूक हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, पोवाडा, महिला सुरक्षा, मोबाईल बुरी बला यासारखे समाज प्रबोधनपर नाटके व गीते तसेच शेतकरी गीत, कोळीगीत, देशभक्तीपर गीते सादर केली, या स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट सादरीकरण ,वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने केले होते. या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन श्री. जाधव सर श्री. गोपनपाळे सर श्री. केंद्रे सर (वर्ग4थी ते 8वी) तसेच श्री.गवंडगावे सर, सौ. कांबळे मॅडम (वर्ग 1 ली  ते 3री ) यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.हैदराबादे सर यांनी मानले. हे स्नेहसंमेलन शिस्तबद्ध ,नियोजनबद्ध व यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Back to top button