बीड

आरशान पठाणचे दमदार शतक; बीडचा ईस्ट झोनवर डावाने व २७० धावांनी विजय

आरशान पठाणचे दमदार शतक; बीडचा ईस्ट झोनवर डावाने व २७० धावांनी विजय
(बीड प्रतिनिधी)-दि.14 नोव्हेंबर-बीडच्या संघाने पुणे येथील सी.पी. ग्राउंडवर झालेल्या MCA U-14 मेन्स इन्व्हिटेशन टूर्नामेंट 2025-26 च्या सामन्यात ईस्ट झोनचा डावाने व तब्बल २७० धावांनी दणदणीत पराभव करत शानदार विजय मिळवला. या विजयात बीडचा आक्रमक फलंदाज आरशान पठाण याने 126 चेंडूत 17 चौकारांसह खेचून काढलेल्या 105 धावांच्या शतकी खेळीने महत्त्वाची भूमिका निभावली. टॉस जिंकत बीडने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो सुरुवातीलाच अचूक ठरला. ईस्ट झोनचा पहिला डाव अवघ्या 75 धावांत (34.5 षटक) गडगडला. त्यानंतर बीडने उत्तम फलंदाजी करत 410 धावांची (63.2 षटक) भक्कम धावसंख्या उभारली. मल्हार खरवडकर (68), कुणाल वाघ (63), कृष्णा गायकवाड (54) आणि रोहित लोणके (52) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला मजबूत बढ़त मिळवून दिली. फॉलोऑन मिळालेल्या ईस्ट झोनचा दुसरा डावही केवळ 65 धावांत (23 षटक) संपुष्टात आला.
बीडच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात ईस्ट झोनला पूर्णपणे नामोहरम केले. कृष्णा सचिन गायकवाडने पहिल्या डावात 6 षटकांत 3 मेडनसह 11 धावांत 4 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात 10.5 षटकांत 6 मेडनसह 22 धावांत पुन्हा 4 विकेट घेतल्या. कुणाल वाघने दोन्ही डावात मिळून 7 विकेट घेतल्या, तर रोहित लोणकेने 5 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. ईस्ट झोनकडून मल्हारने एकहाती लढत देत 5 विकेट घेतल्या.
बीडने हा सामना डावाने व 270 धावांनी जिंकत स्पर्धेत भव्य सुरुवात केली असून आगामी सामने अधिक रोमांचक होण्याचे संकेत दिले आहेत. या प्रभावी प्रदर्शनाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, तसेच महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, शेख आरिफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखूड, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे आणि पठाण शाहरुख यांनी संघातील सर्व खेळाडूंना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
Back to top button