बीड

महाराष्ट्राची लोककला जगप्रसिध्द निलम शिर्के – सामंत

महाराष्ट्राची लोककला जगप्रसिध्द
निलम शिर्के – सामंत
बीड(प्रतिनिधी)ः भारत देश हा विविधा कलांनी गुण असणारा देश आहे.प्रत्येक राज्याची आपली विशिष्ट अशी संस्कृती व  लोककला आहे. ती जोपासण्याचा व प्रसार, प्रचार करण्याचा  व बालकांमध्ये रूजविण्यासाठी प्रत्येक राज्य प्रयत्नशील आहे. ज्ञात असलेल्या, नसलेल्या कलांची ओळख करून ती आपल्या माध्यमातून रसिकांपर्यंत जाणं गरजेच आहे. आपल्यामध्ये विविध कला गुण गुतलेले असतात. यांची ओळख करून घेऊन सादर करणं आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात ठामपणे  हो नाही म्हणता आलं पाहिजे. प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी सहभागी न होता, आनंद घेण्यासाठी व शिकण्यासाठी सहभागी व्हावे.त्या सोबतच बालरंगभूमीच्या माध्यमातून कला संस्कार शिबीरांचे आयोजन केले जाते.
वय वर्ष अठराच्या खालील मुलांना या शिबीरात मोफत प्रवेश आहे. अशा मुलांनी कला संस्कार शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.नृत्याचा स्थायी भाव आनंद घेत घेत आनंद देणे हा आहे.बालरंगभूमी मुलांच्या कला गुणांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. असे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष निलमताई शिर्के सामंत बीड येथील जल्लोष लोककलेच्या या कार्यक्रमाच्या समारोप  प्रसंगी अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या.
बालरंगभूमी परिषद बीड शाखेच्या अध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागर तसेच परिक्षक म्हणून श्री.दिलीप खंडेराय, संजयजी जाधव,राजू सोनवणे,केदार देशमुख, पदाधिकारी स्नेहलताई  पाठक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर,उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ.अनिता शिंदे,कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर मंचावर उपस्थित होते.
बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित जल्लोष लोककलेचा या लोककला गायन,वादन,नृत्य महोत्साचे आयोजन  दिनांक 15 नोंव्हेंबर 2025 रोजी बीड शाखेच्या वतीने सौ.केएसके महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी याकार्यक्रमात परिसरातील 438 बालकलावंत व संघ या कार्यक्रमास सहभागी झाले होते. हा कार्यक्रम दोन सत्रात झाला. दिवसभर बालकलावंत त्यांच्या विविध कला दोन मंचावर सादर केल्या.
या जल्लोष लोककलेचा कार्यक्रमात परिक्षकानी सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी पुढील प्रमाणे संघ व कलावंताची निवड केलेली आहे.यामध्ये वैयकतीक लोकगीत गायन या प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून यश नाईकवाडे,पार्थ पवार यांना विभागून दिले तर उत्कृष्ट विशाखा व्हरकटे, उत्तम सिध्दी पाटील आणि आनंद धुताडमल यांना विभागून दिले. प्रशंसनीय वेदांत काजळे,स्वराली साळूंके यांना विभागून बक्षीसे देण्यात आली. लोकगीतसमूह गायनामध्ये सर्वोत्कृष्ट संस्कार विद्यालय,बीड उत्कृष्ट पोदार इंग्लीश स्कूल बीड, उत्तम-धुतेकर विद्यालय बीड, प्रशंसनीय-छत्रपती शाहू विद्यालय व स्वराली संगीत विद्यालय यांना विभागून देण्यात आले. समूह लोकनृत्य सर्वोत्कृष्ट म्हणून आर्ट ऑफ फन गेवराई, मंगळागौरी या नृत्याला देण्यात आले तर उत्कृष्ट म्हणून खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई (गांधळी),उत्तम  विनायक विंद्यालय,बीड (शेतकरी नृत्य), प्रशंसनीय- केंब्रीड इंटरनॅशनल स्कूल गेवराई,(मंगळागौरी) आणि चिंतेश्वर विद्यालय गेवराई (वाघ्या मुरळी) असे देण्यात आले.वैयक्तीक लोकनृत्यामध्ये सर्वोत्कृष्ट इश्वरी राधाकृष्ण वाघ,मधुरा महेश चिंचोलकर,उत्तम- वैष्णवी राहूल गायकवाड,प्रशंसनीय -समृध्दी सतिष काकडे व रूही राजेंद्र बडे यांना विभागून पारितेषिके देण्यात आले.लोकवाद्य वादन या प्रकारात सर्वोत्कृष्ट पदमाकर सरवदे, उत्कृष्ट संदीप कानडे (हालगी), उत्तम कबीर सोनवणे व रितेश कानडे तर प्रशंसनीय शुभम वाकसे व जयदेव कानडे यांना विभागून पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमाचे  आभार  प्रदर्शन व सूत्रसंचालन डॉ.संजय पाटील देवळाणकर यांनी केले. या  समारोप  कार्यक्रमासाठी बीड शाखेचे विलास सोनवणे, नामदेव साळूके,सुरेश साळुंके,मिलींद शिवणीकर,राहूल सोनवणे,दुष्यंता रामटेके व विजय राख,  अमित गाढे,सुरेश थोरात,पवन शिंदे,रोहित पुराणीक,बाळासाहेब कांबळे,दिपक गिरी,प्रा. इंद्रजीत भांगे,प्रा.असलम शेखसह सर्व पदाधिकारी, रसिक,श्रोते, बालकलावंत मोठया संख्येने उपस्थित होते.
Back to top button