अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँक आपल्या देशात आदर्श-मंत्री जयकुमार गोरे

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बँक आपल्या देशात आदर्श-मंत्री जयकुमार गोरे
जामखेड प्रतिनिधी;-अहिल्यानगर जिल्हयातील प्राथमिक शिक्षक बँक ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आदर्श कारभार असलेली बँक आहे. असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले.बँकेच्या ठेवी १५०४ कोटी व कर्ज वाटप ११२७ कोटी व कर्जाचा एन.पी. ए.शून्य टक्के आहे.तसेच कर्जवाटप कायम चालू आहे.महाराष्ट्र राज्य संघाचे महामंडळ अधिवेशन नुकतेच श्रीक्षेत्र गोंधवले येथे झाले त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.अधिवेशनास देशातील शिक्षकांचे नेते संभाजीराजे थोरात,राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप,राष्ट्रीय शिक्षक नेते बाळसाहेब झावरे , राज्यनेते रावसाहेब रोहोकले , डॉ. संजय कळमकर ,जिल्हा नेते राजकुमार साळवे सुरेश निवडुंगे , आदि उपस्थित होते.यावेळी जयकुमार गोरे यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे , व्हा.चेअरमन रमेश गोरे यांची व उपस्थित संचालक भाऊराव राहिंज , कैलास सारोक्ते ,अण्णासाहेब आभाळे ,संतोष राऊत ,बाळसाहेब तापकीर , रामेश्वर चोपडे ,सूर्यकांत काळे यांचा सत्कार करण्यात आला .शिक्षक नेते प्रविणजी ठुबे
बँकेचे माजी पदाधिकारी राजू राहणे , आर. टि . साबळे , राम निकम , किसनराव वराट तसेच बँकेचे माजी पदाधिकारी अविनाश निंभोरे बाबा पवार उपस्थित होते .यावेळी सर्व संचालक मंडळाचे मंत्री महोदयांनी बँकेच्या कारभाराबाबत कौतूक केले.



